पुणे: “कचऱ्याची गिफ्ट पॅकिंग; वाघोलीकरांचा नगर रोड क्षेत्रीय कार्यालयला अनोखा दणका” – व्हिडिओ

पहा व्हिडिओ
पुणे : वाघोलीत कचऱ्याचा प्रश्न किती गंभीर आहे, हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवण्यासाठी एका नागरिकानेच भन्नाट युक्ती शोधली. समाजसेवक सुभाष जाधव यांनी दहा दिवस तक्रारी, फोटो, व्हिडिओ करूनही कचरा न उचलल्याने अखेर तोच कचरा भेटवस्तूच्या स्वरूपात पॅक करून नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांना ‘गिफ्ट’ दिला.
दुर्गंधीत जगणारे नागरिक, मात्र गोड झोपलेले अधिकारी
जाधव यांच्या घराशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता. त्यातून पसरलेली दुर्गंधी सहन करत स्थानिक रहिवासी संतापले होते. पण, प्रशासन मात्र दहा दिवसांपासून गाढ झोपेत होते. फोन, फोटो, व्हिडिओ काहीही केलं तरी ‘कचरा’ उठण्याची हालचालही झाली नाही.
कचरा झाला भेटवस्तू!
शेवटी कंटाळून जाधव यांनीच त्या कचऱ्याला ‘गिफ्ट पॅक’ करून पालिकेला सुपूर्द केला. रंगीत कागदात पॅक केलेल्या या पोत्यातली भेटवस्तू उघडल्यावर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरच कचऱ्याचा रंग चढला!
प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड
कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च होतात, जाहिरातीवर लाखो रुपये उधळले जातात, पण प्रत्यक्षात नागरिकांपुढे दुर्गंधीयुक्त वास्तव उभं राहिलं आहे. एका नागरिकाला प्रशासनाची जाग येण्यासाठी अशी आगळीवेगळी कृती करावी लागली, ही महापालिकेच्या कारभारावरची मोठी चपराकच आहे.
वाघोलीत कचरा ‘गिफ्ट’ करावा लागतोय, उद्या पाणीटंचाईवर काय गिफ्ट द्यायचं? हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
—