पुणे: जुगाराचा खेळ संपला तुरुंगात! लष्कर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; अकरा जण ताब्यात, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने कॅम्प परिसरातील भिमपुरा येथील बालाजी सोशल क्लब या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतले असून, एकूण १ लाख ४२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, राजेश जनार्दन श्रीगिरी यांच्या मालकीच्या बालाजी सोशल क्लब (१७७/२४, भिमपुरा, कॅम्प) येथे “तीन पत्यांचा फ्लॅश” या नावाने जुगार खेळ सुरू होता. पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे रोख रक्कम आणि प्लास्टिक कॉईनवर पैज लावून जुगार खेळला जात असल्याचे आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून १,३५,००० रुपयांचा जुगार साहित्य आणि ७,२४० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १,४२,२४० रुपयांचा माल जप्त केला आहे.
या प्रकरणात बालाजी सोशल क्लबचे मालक राजू जनार्दन श्रीगिरी यांच्यासह अकरा जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, १८८७ चे कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
१) बबन जगन्नाथ मानकर (रा. मानकरवाडी, इंदापूर, पुणे)
२) गणेश तुकाराम भोसले (४२, रा. आळंदी रोड, पुणे)
३) बापू पोपटराव साळुंखे (४४, रा. पारगाव, दौंड, पुणे)
४) दीपक गोरख गुंजाळ (३५, रा. सोनवाडी, अहमदनगर)
५) निलेश काशिनाथ देशमुख (३६, रा. सिद्धेश्वर कुरवली, सातारा)
६) जय तुकाराम जगताप (४१, रा. नांदेड धायरी, पुणे)
७) गणेश ज्ञानेश्वर साठे (४०, रा. पिंपळे निलख, पुणे)
८)प्रेमकुमार संजयसिंग (३५, रा. हडपसर, पुणे)
९)राहुल भिमराव मसुरकर (३५, रा. मुंढवा, पुणे)
१०)अभिजीत भिमराव सोणवणे (५०, रा. घोरपडी, पुणे)
९९) राजू जनार्दन श्रीगिरी (१७७/२४, भिमपुरा, कॅम्प, पुणे)
पोलिसांनी सांगितले की, “शहरात जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल.”
—