पुणे : पालखी सोहळ्यात येरवड्यात मोफत आरोग्यसेवा: येरवडा पोलीस ठाणे आणि नूरी लॅबोरेटरी व नॅशनल हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; वारकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पुणे : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील शादवाल बाबा चौकात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. रविंद्र शेळके (येरवडा पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल हॉस्पिटल, नूरी लॅबोरेटरी आणि पोलीस मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आणि औषध वाटप करण्यात आले.
यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे तीन वारकऱ्यांना सलाईन लावण्याची आवश्यकता भासल्याने त्वरित वैद्यकीय उपचार देण्यात आले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.




या सेवेमध्ये पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) मा. हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मा. प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. रविंद्र शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. ठक्कर, पोलीस उपनिरीक्षक मा. असलम शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. रामेश्वर नवले, पोलीस उपनिरीक्षक मा. नितीन चांदणे, तसेच नॅशनल हॉस्पिटलचे डॉ. वसिम खान व त्यांची टीम, नूरी लॅबोरेटरीचा स्टाफ, आणि पोलीस मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ बशीर शेख, कार्याध्यक्ष बशीर शेख यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे येरवडा परिसरात पालखी सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थीत पार पडण्यास मदत झाली. प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.