पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत ६ जणांवर कारवाई

0

पुणे ड्रग्ज प्रकरणात (Pune Drugs Case) मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाला याप्रकरणात निंलबित करण्यात आले आहे. अनंत पाटील यांच्यावरही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी कारवाई केली आहे.

एफसी रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीमध्ये मद्यविक्री प्रकरणात कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

पुणे एल ३ बार पार्टी प्रकरणामध्ये आतापर्यंत ४ पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत. २ पोलिस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शिवाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, पोलिस हवालदार गोरख डोहिफोडे, पोलीस शिपाई अशोक अडसूळ यांना निलंबित करण्यात आले होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी निरीक्षक विठ्ठल बोबडे, आणि सहनिरीक्षक अनंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमधील पार्टीचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये तरुणाई पार्टी करताना दिसत आहेत. काही तरुण डीजेच्या तालावर धिंगाणा करतात तर काही दारु पिताना दिसत आहेत. रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये पार्टी सुरू होती. ४० ते ५० जण या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या हॉटेलमध्ये दारुच्या नशेत तरुणाईंचा झिंगाट डान्स सुरू होता. या हॉटेलमधील पार्टीमध्ये काही तरुण आणि तरुणी ड्रग्जचे देखील सेवन करत होते. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *