पुणे: वारजे माळवाडीत दीपक बलाढे यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे माळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक बलाढे यांची भारतीय जनता पक्षाच्या खडकवासला (पश्चिम मंडल) अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नियुक्तीपत्र आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पश्चिम मंडल अध्यक्ष गणेश वरपे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, योगेश लिमये, चेतन गोंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्ष बळकटीसाठी व संघटनवाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार बलाढे यांनी व्यक्त केला.