पुणे: जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0
IMG_20250720_113609.jpg

पुणे : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. हा कायदा लोकशाही विरोधी असून संविधानाच्या मूलभूत हक्कांना पायदळी तुडवणारा असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा
या कायद्यान्वये सरकारकडे विरोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावर विनाचौकशी थेट कारवाई करण्याचे अधिकार दिले जात आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून, हा कायदा जुलमी व दडपशाही प्रवृत्तीचा असल्याचा आरोप शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला.

शिंदे म्हणाले, “सरकार संविधानिक मार्गाने काम करणाऱ्या शिव शाहू फुले आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी, शेतकरी व कामगार चळवळी यांचा आवाज बंद करण्यासाठी या कायद्याचा वापर करणार आहे.”

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. यामध्ये हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, कामगार नेते सुनील शिंदे, मेहबूब नदाफ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शासनाच्या भूमिकेवर सवाल
काँग्रेसने सरकारवर गंभीर आरोप करत हा कायदा मागे घेण्याची मागणी केली असून, याविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

You may have missed