पुणे शहर : शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा -धीरज घाटे
पुणे : ‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३’ अन्वये कोणत्याही शाळा, महाविद्यालय वा शिक्षण संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीला बंदी आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही व्यसन लागू नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पण पुणे शहरातील शाळांबाहेर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. शाळांच्या जवळ असलेल्या पान टपऱ्यांवर सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. काही विद्यार्थी शाळेला जाताना किंवा शाळा सुटल्यावर इथे जात असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना व्यसन लागण्याची आणि त्यांच्या मनावर व अभ्यासावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी पुण्याचे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त मा. श्री. संदीप सिंह गिल यांची पालकांसह भेट घेतली आणि त्यांच्याकडे पुण्यातील शाळांच्या बाहेरील परिसराची पोलिसांनी पाहणी करून तिथे जर कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या विषयात लक्ष घालून पोलिसांना आवश्यक निर्देश दिले जातील, असे आश्वासन गिल साहेबांनी दिले आहे.
यावेळी शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह पुणे शहर भारतीय जनता पार्टी युवती आघाडी अध्यक्ष मनीषा धारणे मनीषा सानप आनंद पाटील प्रशांत सुर्वे विजय गायकवाड अमर आवळे पुष्कर तुळजापूरकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते