पुणे: विश्रांतवाडीमध्ये बुद्ध जयंतीचा उत्साह; धम्मक्रांती बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, प्रतिनिधी – विश्रांतवाडी येथील भीमनगरमध्ये बुद्ध जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धम्मक्रांती बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, बौद्ध उपासक-उपासिका, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.
धम्म ध्वजारोहण सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे आणि उपाध्यक्षा सुरेखा वाघमारे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर विहारामध्ये बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने “आज युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे,” असा संदेश दिला आणि प्रज्ञा, शील, करुणा या भगवान बुद्धाच्या मूलभूत तत्त्वांवर भर दिला.
पहा व्हिडिओ
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये शिवाजी वाघमारे, मल्हारी कांबळे, अनिल पटेकर, राजेश राऊत, सुरेश किर्ते, सतीश ओव्हाळ, राणा डोंगरे, संजय सोनवणे, अभिजीत कसबे, सचिन क्षीरसागर, विश्वंभर शिंदे, नागेश देडे, नानाभाऊ सोनवणे, सुरज उजगरे, शिवाजी सोनवणे, सुनील उजगरे, सिद्धांत कांबळे, सुमन कांबळे, नमाताई घोडके, आम्रपाली सोनवणे, आशा पारडे, मैनाताई गायकवाड, गजराबाई जोगदंड यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन धम्म प्रसारक विकास पारडे आणि संतोष पिल्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.