पुणे: बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या; नैराश्याची शक्यता

0
n675643247175446131010901a8bcb6d1014d8da81563c29efd47ed0d3a84979686331aac0ecc0c2c15ec81.jpg

पुणे | प्रतिनिधी
शहरातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मृत विद्यार्थिनीचे नाव ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आहे. आत्महत्येमागे नैराश्य कारणीभूत असावे, अशी शक्यता प्राथमिक तपासात वर्तवण्यात येत आहे.

ज्योती ही मूळची राजस्थान येथील रहिवासी असून, ती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहातच वास्तव्यास होती. मंगळवारी रात्री वसतिगृहातील तिच्या खोलीसमोरील मोकळ्या खोलीत तिने गळफास घेतल्याचे तिच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले.

ही बाब लक्षात येताच हॉस्टेलमधील इतर विद्यार्थ्यांनी आणि अधिवास कर्मचाऱ्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. या वेळी पोलिसांना तिच्या खोलीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये तिने आपले मानसिक नैराश्य व्यक्त केल्याचे समजते. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालय प्रशासन आणि वसतिगृह व्यवस्थापनाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या ही दुर्दैवी असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

Spread the love

Leave a Reply