पुणे: येरवड्यात फक्त नावालाच अतिक्रमणविरोधी कारवाई; PMCच्या निष्क्रीयतेवर नागरिकांचा संताप – व्हिडिओ

0
IMG_20250806_214445.jpg

पहा व्हिडिओ

पुणे, येरवडा | प्रतिनिधी – येरवडा परिसरातील सौ. शीला राज साळवे भाजी मंडईसमोर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेली कारवाई केवळ दिखाऊ ठरल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. कारवाईनंतरही संध्याकाळपर्यंत अतिक्रमण पुन्हा पूर्ववत झाले असून, यावर कारवाई करणारे अधिकारी आणि धडक पथक कुठेच दिसून आले नाहीत.

सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम ही केवळ ‘नावाला’ असते. अधिकारी महिन्याला ठराविक हप्ते घेतात, त्यामुळे कारवाई नंतर अतिक्रमण पुन्हा सुरू होणे ही नेहमीचीच गोष्ट झाली आहे.”

नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी दिल्या असूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. “तक्रारी देऊन काही उपयोग नाही. प्रशासन कानाडोळा करत आहे. यामागे आर्थिक देवाणघेवाणीचे मोठे जाळे आहे,” असा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला.

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

(ताज्या अपडेटसाठी आमच्यासोबत राहा.)

Spread the love

Leave a Reply