पुणे: अंजुमन ए इस्लाम पिर मोहम्मद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजत १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गौरव

0
FB_IMG_1754598477124.jpg

पुणे – बंडगार्डन रोड येथील वाडिया कॉलेज शेजारील अंजुमन ए इस्लाम पिर मोहम्मद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींचा शैक्षणिक यशाबद्दल गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुनील थोपटे (कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) आणि माजी नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती सदस्य मा. संतोष आरडे यांचा समावेश होता.

विशेष बाब म्हणजे ही संस्था केवळ मुलींसाठी असून गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहे. मा. संतोष आरडे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांना गेली १८ वर्षे सातत्याने  उपस्थित राहत आहे. “शाळेतील सर्व शिक्षिका आणि प्राचार्य मला नेहमी मोठ्या बहिणीप्रमाणे पाठिंबा देतात. त्यांच्या प्रेमळ सहकार्यामुळे मी वर्षानुवर्षे या कार्यक्रमांचा भाग बनू शकलो.”

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपले अनुभव आणि भविष्यातील योजना सादर केल्या. संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Reply