पुणे: विमाननगर चौकात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांची धडक कारवाई

0
n650005473173838781975560056cbe77201588746233b32486a8886ef77e786b45dc2f5f6ecb8344e377ba.jpg

पुणे: शहरात अमली पदार्थ तस्करीस आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने कठोर कारवाई सुरू केली असून, ‘मिशन झिरो टॉलरन्स ऑफ ड्रग्ज’ अंतर्गत तस्करांविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल २५.५१ लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि गांजा जप्त करण्यात आला आहे.

तीन आरोपी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त
या मोहिमेत कुमेल महम्मद तांबोळी (वय २८), सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख (वय ५२) आणि किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

कुमेल तांबोळी याच्याकडून १९.१७ लाख रुपयांचे ८३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैफन ऊर्फ शफिक शेख याच्याकडून ३५० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून, त्याच्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अंतर्गत कारवाई झाली आहे.

किरण तुजारे याच्याकडून ६.२७ लाख रुपयांचे ३० ग्रॅम ३५ मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुप्त माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई शक्य झाली.

पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर येथे सापळा रचून कुमेल तांबोळीला अटक करण्यात आली.

पोलीस अंमलदार अझिम शेख यांच्या माहितीच्या आधारे बिबवेवाडीतील आनंदनगरमध्ये छापा टाकून सैफन ऊर्फ शफिक शेखला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विमाननगर चौकात सापळा रचून किरण तुजारेला अटक करण्यात आली.


पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम यशस्वी
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व राजेंद्र मुळीक यांच्या देखरेखीखाली अमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम आणि पथक २ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी विशेष भूमिका बजावली.

पोलिसांचा इशारा: अमली पदार्थ तस्करांना सोडणार नाही
शहरात अमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ‘मिशन झिरो टॉलरन्स ऑफ ड्रग्ज’ अंतर्गत आगामी काळात अधिक मोठ्या कारवायांची शक्यता आहे.

संपादक : पुण्यातील गुन्हेगारीविरोधी पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे शहरात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *