पुणे: महामार्गावर हॉटेल की ‘सेवाकेंद्र’?
जयश्री एक्झिक्युटिव्हमध्ये वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

0
IMG_20251221_140218.jpg

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर प्रवाशांच्या विश्रांतीसाठी असलेले हॉटेल प्रत्यक्षात कोणती “सेवा” देत होते, याचा पर्दाफाश लोणी काळभोर पोलिसांनी केला. कवडीपाट टोलनाक्याजवळील नामांकित जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट, बार अँड लॉजिंगमध्ये खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्याने ‘हायवेवरील प्रतिष्ठित हॉटेल्सची नैतिकता’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

पहा व्हिडिओ

हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर द्यायची की ‘महिलांची सर्व्हिस’ घ्यायची, असा पर्याय मिळत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून कारवाई केली. विशेष म्हणजे, मॅनेजर मोहन कसनू राठोड यांनी कोणतीही लाज न बाळगता पंचांसमक्ष होकार देत हॉटेलचा खरा ‘व्यवसाय मॉडेल’ उघड केला. हॉटेल मॅनेजर आणि ऑफिसबॉय-वेटर गणेश चिलकेवार यांना ताब्यात घेण्यात आले, तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

महामार्गावरच्या हॉटेलमध्ये ‘थांबा आणि ताजेतवाने व्हा’ या जाहिरातीचा अर्थ नेमका काय, असा सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत. टोलनाक्याजवळचे हे हॉटेल प्रशासनाच्या नजरेआड कसे चालू होते, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतरच कारवाई होते, मग इतके दिवस पोलिसांची आणि इतर यंत्रणांची झोप कुठे लागली होती, असा टोमणा नागरिकांकडून लगावला जात आहे.

या कारवाईमुळे महामार्गावरील हॉटेल्समधील ‘गुप्त व्यवसायां’वर प्रकाशझोत पडला असला, तरी प्रश्न कायम आहे—ही एक अपवादात्मक कारवाई की फक्त हिमनगाचा टोक? हॉटेलच्या नावात ‘एक्झिक्युटिव्ह’ असले, तरी व्यवहार मात्र पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे उघड झाले असून, अशा हॉटेलांवर कडक कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed