पुणे: माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 300 कोटींच्या संपत्तीचा पर्दाफाश!

0
n6502769191738576052935c5c3c6a3715d98074b0301444f5c2fbe3288f3841e776939c9e9b93a041d9022.jpg

पुणे: पुणे शहराचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीत तब्बल 300 कोटींहून अधिक संपत्ती उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी आता उघड चौकशीसाठी परवानगी मागण्यात आली असून, उच्चपदस्थ IPS अधिकाऱ्याच्या चौकशीचा हा पहिलाच प्रकार असल्याची चर्चा आहे.

संपत्तीची मोठी रक्कम समोर
माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने गुप्त चौकशी केली. यातून काही ठोस तथ्ये समोर आल्यानंतर उघड चौकशीची मागणी करण्यात आली आहे. गुप्ता यांनी विविध राज्यांमध्ये कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

पुणे: ॲमनोरा टाउनशिपमधील ‘स्वीट वॉटर व्हिला’ प्रकल्पात 25 ते 30 कोटींचा आलिशान व्हिला

मुंबई: सांताक्रुझ येथे 22 कोटींचा आलिशान फ्लॅट

इतर राज्ये: मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी


शस्त्र परवाना घोटाळ्याचा आरोप
अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलिस आयुक्तपदावर असताना 800 ते 1000 शस्त्र परवाने वाटल्याचा आरोप आहे. तसेच, प्रत्येक परवान्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेतल्याचा दावा सुधीर आल्हाट यांनी केला आहे.

उघड चौकशीसाठी अद्याप परवानगी नाही
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा महिने पूर्वीच उघड चौकशीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही परवानगी तातडीने मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, पुढील तपासात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed