जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; बावधन व रहाटणीतील ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
n6479742631737092557569b54ed405de19bef528ded78e45a71b10a370da3430ad5172e6ca012e51346f6c.jpg

पिंपरी-चिंचवड: बावधन आणि रहाटणी परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) छापे टाकत दोन कारवाया केल्या. या कारवायांमध्ये ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली कारवाई – बावधन:
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान चौक येथे रमेश बबन दगडे (वय ५४) हा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मटका नावाचा जुगार घेत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी कारवाई करत रमेश याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि १,५०० रुपये रोख रक्कम जप्त केली. रमेशने जुगारातील आकडे आणि पैसे पवन कोल्हे याला पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे रमेश दगडे आणि पवन कोल्हे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुसरी कारवाई – रहाटणी:
रहाटणी येथे काळेवाडी पोलिसांनी छापा टाकून अमोल राम विटेकर (वय ४६) आणि महेश सिद्धार्थ जाधव (वय ३६) यांना जुगार खेळताना आणि खेळवताना पकडले. आरोपींनी मोबाईलच्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेतल्याचे आढळले. त्यांच्या ताब्यातून १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. काळेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुगारावर नियंत्रण आणण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत या दोन्ही कारवाया करण्यात आल्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed