पोलीसांना कोणतीही कल्पना न देता पालकमंत्र्याची मटका अड्ड्यावर धाड – व्हिडिओ व्हायरल

0
nitesh-rane-raid-on-jugar-adda.jpg

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली बाजारपेठेतील एका नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर अचानक धाड टाकली. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत एकच खळबळ उडाली.

पहा व्हिडिओ

महाराष्ट्र माझा नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार, घेवारी नावाच्या नामचीन व्यक्तीच्या अड्ड्यावर ही कारवाई करण्यात आली. धाडीत घेवारीसह नऊ ते दहा जण मटका खेळताना आढळून आले. विशेष म्हणजे, मंत्री राणे यांनी पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट धाड टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कारवाईनंतर कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पुढील प्रक्रिया सुरू केली. पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी स्वतः जाऊन केलेली ही पहिलीच धडक कारवाई मानली जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांकडून राणेंच्या या थेट कारवाईचे कौतुक केले जात आहे.


Spread the love

Leave a Reply