विश्रांतवाडी: नशामुक्त पुण्याच्या दिशेने मोठी झेप: अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची कारवाई

drugs-news-crime-news-700x375.jpg

पुणे: पुणे शहराला नशामुक्त बनविण्याच्या उद्देशाने पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाईला सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथक तयार करून तस्करांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. मेफेड्रॉनसह विविध अमली पदार्थांच्या विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष रणनीती आखली आहे.

पोलिसांनी अलीकडेच येरवड्यातून तब्बल 22 लाख रुपये किंमतीचे 110 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. त्यानंतर एमजी रोड परिसरात दोन तस्करांना पकडून 15.7 लाखांचे मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले.

विद्यार्थ्यांपासून नोकरदार तरुणांपर्यंत विस्तार
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत अमली पदार्थांचा फास पसरविणाऱ्या तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत आहेत. परराज्यांसह परदेशातून येणाऱ्या ड्रग्जचा मागोवा घेऊन तस्करांची साखळी उध्वस्त केली जात आहे.

विशेष पथकांची कामगिरी
अमली पदार्थ विरोधी पथकांनी प्रत्येक झोनमध्ये तस्करांना लक्ष्य केले असून, माहितीच्या आधारावर ट्रॅप लावून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. ही मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी यशस्वी कारवाया केल्या आहेत.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे:
“पुणे हे विद्येचे माहेरघर असून, शहरात कोणत्याही प्रकारची अमली पदार्थ विक्री खपवून घेतली जाणार नाही. आमच्या कारवाईत साडेतीन हजार कोटींच्या मेफेड्रॉन रॅकेटचा उद्ध्वस्त झाला आहे. नशामुक्त पुणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, आणि त्यासाठी तस्करांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील.”

नशामुक्त पुण्यासाठी पुढाकार
पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहराच्या प्रत्येक भागात शोधमोहीम सुरू असून, तस्करांच्या पाळेमुळे उखडून टाकण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.

नशामुक्त पुण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम नक्कीच महत्त्वाचा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Spread the love

You may have missed