Nashik: तुरुंगातून सुटल्याच्या आनंदात ‘भाऊं’नी काढली जल्लोष रॅली; Reel व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा अटक (Video)

n62384496517220642656941fca476e0cbc63cc6f93268b634d377adfe88f54a82f2a7a2d299175ce27c972.jpg

महाराष्ट्रातील नाशिकमधील कुख्यात गुंड हर्षद पाटणकरची 1 वर्षानंतर तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी हर्षदने आपल्या कार्यकर्त्यांसह, बेथेल नगर ते आंबेडकर चौक अशी मेगा ‘कमबॅक’ रॅली काढली.

आता या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. नाशिक शहर पोलिसांनी याची माहिती दिली आहे. अहवालानुसार, 23 जुलै रोजी पाटणकरची तुरुंगातून सुटका झाल्याने त्याच्या समर्थकांनी जल्लोष रॅली काढली. बेथेल नगर ते आंबेडकर चौकापर्यंत कार आणि सुमारे 15 दुचाकींचा ताफ्यासह ही रॅली पार पडली. त्यानंतर अनधिकृत रॅलीचे आयोजन करून सार्वजनिक गोंधळ घातल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पाटणकर आणि त्यांच्या सहा साथीदारांना अटक केली. अहवालानुसार, पाटणकरवर यापूर्वीच्या खटल्यांमधून खुनाचा प्रयत्न, चोरी आणि हिंसाचार यासह अनेक आरोप आहेत.

नाशिक पोलिसांनी असेही सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत नागरिकांनी त्यांना इंस्टाग्राम/फेसबुक/ट्विटर मेसेजेसद्वारे 91 रील्स पाठवल्या, ज्यावर त्यांच्या सायबर पेट्रोलिंग उपक्रमांतर्गत कारवाई केली जात आहे.

पहा व्हिडिओ

Spread the love

You may have missed