जालन्यात पालिका आयुक्त रंगेहाथ पकडले; 10 लाखांची लाच स्वीकारताना ACB ची कारवाई

जालना – जालनामहानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराकडून बांधकामाचे बिल पास करण्यासाठी ही लाच मागितली होती.
ACB ने संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून कारवाई केली. अटक झाल्यानंतर आयुक्तांच्या घराची सविस्तर छाननी करण्यात आली.
यावेळी काही कंत्राटदारांनी ACB कार्यालयाबाहेर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला. कंत्राटदारांनी या कारवाईस समर्थन व्यक्त करत, ACB अधिकाऱ्यांचे आभारही मानले.
जालना महापालिकेत ही घटना मोठ्या चर्चेचा विषय बनली असून, पुढील तपास ACB कडून सुरू आहे.
—