पुण्यात महात्मा गांधी रस्त्यावर, कोळसे गल्लीतील दुकानातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

n648057946173717783662593149ba4b62fcff0694879408d0c4761fcd16e4cc6868a62efdacc14a3c26a5a.jpg

पुणे: महात्मा गांधी रस्त्यावरील कोळसे गल्ली परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत १५ लाख ७० हजार रुपये किमतीचे ७७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. अटक केलेले आरोपी हुसेन नुर खान (वय २१) आणि फैजान अयाज शेख (वय २२, दोघे रा. कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत.

फैजान याचे महात्मा गांधी रस्त्यावरील कोळसे गल्लीत कुलूप विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचा उपयोग छुप्या पद्धतीने मेफेड्रोन साठवणूक आणि विक्रीसाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधीही येरवडा भागात पोलिसांनी २३ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

विशेष पोलीस कर्मचारी विशाल दळवी यांना कोळसे गल्लीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. फैजान आणि हुसेन यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या दुकानातून मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

पथकाची कामगिरी:
अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे आणि उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आणि पोलीस कर्मचारी संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी ही यशस्वी कारवाई केली.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्रीस मोठा धक्का बसला असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

You may have missed