लोणी काळभोर येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 4 जणांना बेड्या ठोकत14 हजारांचा मुद्देमाल केला जप्त

n65300290117402279660487dce0d519124917356226f122e6440a3e516c1519b82dd5cbdc9dac77444c01b.jpg

पुणे: लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील श्रीमंत अंबरनाथ बिल्डींगच्या बोळात खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्याचा पर्दापाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी गुरुवारी (ता. 20) सव्वा चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकून 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मनेष गरुलिंग नगरे (वय 54 ), योगेश सुरेश महाजन (वय 41), चैतन्य राजेंद्र सोनावणे (वय 29) व समिर सिध्दार्थ कांबळे (वय 34, चौघेही रा. लोणी काळभोर, ता.हवेली, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर आरोपी योगेश महाजन याच्यावर याअगोदरही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियमन कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे यांना लोणी काळभोर गावातील श्रीमंत अंबरनाथ बिल्डींगच्या बोळात खुलेआम मटका जुगार सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा आरोपी समिर कांबळे हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार पैशांवर खेळत असताना मिळून आले.

दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात 4 जणांवर महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियमन कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 14 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील नागलोत करीत आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, विलास शिंदे, सुनील नागलोत, संभाजी देवीकर, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे, योगेश पाटील, शैलेश कुदळे, राहुल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Spread the love

You may have missed