पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या मोठ्या बदल्या; पोलिस दलात मोठा खांदेपालट

0
maharashtra-Politics-2025-10-17T085215.407_V_jpg-442x260-4g.webp

पुणे: शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिस दलात मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आदेशित केल्या आहेत. या बदल्यांमध्ये गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक आणि नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत.

सध्या वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आता कंट्रोल व वाहतूक शाखेत नेमले गेले आहेत. याशिवाय गुन्हे शाखेतील अनेक युनिटचे अधिकारी नवीन नेमणुकीवर आहेत.

बदल्यानुसार पोलिस निरीक्षकांचे नवीन नेमणूक ठिकाणे:

1. कांचन जाधव (विश्रांतवाडी पोलिस ठाणे) → गुन्हे शाखा

2. रवींद्र शेळके (येरवडा पोलिस ठाणे) → वाहतूक शाखा

3. माया देवरे (मुंढवा पोलिस ठाणे) → गुन्हे शाखा

4. सुनील पंधरकर (नियंत्रण कक्ष) → आर्थिक गुन्हे शाखा

5. विजय टिकोळे (विशेष शाखा) → वाहतूक शाखा

6. अजय संकेश्वरी (नियंत्रण कक्ष) → आर्थिक गुन्हे शाखा

7. संतोष सोनवणे (नियंत्रण कक्ष) → गुन्हे शाखा

8. संदीपान पवार (विशेष शाखा) → गुन्हे शाखा

9. अरुण हजारे (नियंत्रण कक्ष) → आर्थिक गुन्हे शाखा

10. गुरुदत्त मोरे (नांदेड सिटी पोलिस ठाणे) → विशेष शाखा

11. दत्ताराम बागवे (विश्रांतवाडी पोलिस ठाणे) → गुन्हे शाखा

12. अंजुम बागवान (गुन्हे शाखा) → येरवडा पोलिस ठाणे

13. मंगेश हांडे → विश्रांतवाडी पोलिस ठाणे

14. स्मिता वासनिक (गुन्हे शाखा) → मुंढवा पोलिस ठाणे

15. भाऊसाहेब पाटील (गुन्हे शाखा) → वानवडी पोलिस ठाणे

16. कुमार घाडगे (गुन्हे शाखा) → कोंढवा पोलिस ठाणे

17. प्रदीप कसबे (आर्थिक गुन्हे शाखा) → विश्रामबाग पोलिस ठाणे
पुण्यातील पोलिस दलात ही मोठी बदल्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Spread the love

Leave a Reply