दुधनीत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; आझम भाई शेखजी यांचे विशेष योगदान

दुधनी (प्रतिनिधी) — दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आझम भाई शेखजी यांच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लिनाथ येगदी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व नारळ फोडून करण्यात आली.
पहा व्हिडिओ
कार्यक्रमास बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लिनाथ येगदी, आर. पी. आय. चे जिल्हा उपाध्यक्ष सैदपा झळकी, शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, मुस्लिम अल्पसंख्याक अध्यक्ष मेदिमिया जिडगे, युवा नेते बरावराज हौदे, बसवराज गुरुभेट्टी, विनायक कोतली, गुरूशांत वडियार, गुरूशांत सलिमाठ, सैदू कोटनूर, तसेच सामाजिक कार्यकर्ते आझम भाई शेखजी, इब्राहिम अत्तार, दाऊद नदाफ, युनूस बडेखा, अशपाक मुजावर, अबुबकर शेख, रमझान नदाफ, साजिद नदाफ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आझम भाई शेखजी यांचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.