जीवनरक्षक औषधे स्वस्त ! जीएसटी काऊन्सिलचा मोठा निर्णय; 33 औषधांवरील कर शून्य

नवी दिल्ली – जीएसटी काऊन्सिलच्या 56 व्या बैठकीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. बुधवारी (3 सप्टेंबर) झालेल्या या बैठकीत कर रचनेत मोठे बदल करण्यात आले असून देशात आता केवळ 5% आणि 18% हे दोनच कर स्लॅब्स लागू राहणार आहेत.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 33 जीवनरक्षक औषधांवरील 12% जीएसटी पूर्णपणे रद्द करून तो शून्य करण्यात आला आहे. यामुळे गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधे आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.
कोणत्या औषधांवर जीएसटी शून्य?
कर्करोग, रक्तविकार, अनुवांशिक आजार आणि इतर गंभीर आजारांवरील महागडी औषधे या यादीत आहेत. त्यामध्ये
- Onasemnogene abeparvovec
- Asciminib
- Mepolizumab
- Pegylated Liposomal Irinotecan
- Daratumumab
- Daratumumab (subcutaneous)
- Teclistamab
- Amivantamab
- Alectinib
- Risdiplam
- Obinutuzumab
- Polatuzumab vedotin
- Entrectinib
- Atezolizumab
- Spesolimab
- Velaglucerase Alpha
- Agalsidase Alfa
- Rurioctocog Alpha Pegol
- Idursulphatase
- Alglucosidase Alfa
- Laronidase
- Olipudase Alfa
- Tepotinib
- Avelumab
- Emicizumab
- Belumosudil
- Miglustat
- Velmanase Alfa
- Alirocumab
- Evolocumab
- Cystamine Bitartrate
- C1-Inhibitor (injection)
- Inclisiran
आदी औषधांचा समावेश आहे.
कधीपासून लागू?
नवा नियम 22 सप्टेंबरपासून, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहे. त्यानंतर या औषधांवर कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही.
सर्वसामान्यांना दिलासा
जीएसटी काऊन्सिलने साबण, सायकल, टीव्ही, आरोग्य व जीवन विमा पॉलिसी यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर दर कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटवरचा कर दर कायम राहणार आहे.
आर्थिक परिणाम
कर रचनेतील या बदलांचा अंदाजे 48 हजार कोटी रुपयांचा परिणाम होईल, असे महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. परंतु देशाच्या एकूण आर्थिक स्थितीवर त्याचा मोठा परिणाम होणार नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या भाषणात कर रचना सोपी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसारच जीएसटी काऊन्सिलने या बैठकीत मोठा निर्णय घेतला असून, गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
—