लहुजी शक्ती सेनेचा अक्कलकोटात संघटनात्मक परिसंवाद; मातंग समाजाच्या नव्या संघटनाला सकारात्मक नांदी

IMG-20251228-WA0013.jpg

अक्कलकोट : साठे नगर, माणिक पेठ, अक्कलकोट येथे दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी लहुजी शक्ती सेना वतीने संपूर्ण मातंग समाज अक्कलकोट तालुका व शहर संघटित करण्याच्या उद्देशाने चर्चा सत्र, परिसंवाद तसेच संघटनेची कार्यकारिणी व नव्या पदवाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समाज बांधव व भगिनींचा उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.

या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी कोनाळी, कर्जाळ, वळसंग, धोत्री, मुस्ती, चुंगी, दहीटणे आदी गावांमध्ये गावभेटी घेण्यात आल्या होत्या. वेळेअभावी काही गावांमध्ये प्रत्यक्ष पोहोचता न आले तरीही समाजातून मिळालेला प्रतिसाद लक्षणीय ठरला. समाजातील मरगळ झटकून नव्या दमाने, प्रामाणिक नेतृत्वाखाली संघटन उभे राहत असल्याची भावना उपस्थित समाज बांधवांच्या मनोगतांतून व्यक्त होताना दिसून आली.

या बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष बाबाजी कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व नागेश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटोळे, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष कचरू भाऊ सगट, माजी उपनगराध्यक्ष यशवंत तात्या घोंगडे, जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ कसबे, धाराशिव जिल्हा युवक उपाध्यक्ष रामजी भाऊ गायकवाड, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ दुणगे, तालुका कोअर कमिटी अध्यक्ष नितीन भाऊ हटकर, तालुका उपाध्यक्ष महेश वाघमारे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मातंग समाज अध्यक्ष निवृत्तीजी पारखे व समाजाचे आधारस्तंभ किसन सेठ जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच लहुजी शक्ती सेनेच्या तालुका व शहर स्तरावरील एकूण ४२ नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उल्हास शिरसागर, धर्मा भाऊ आवळे, अंबादास कांबळे, बाळू शिरसागर, सुदर्शन कांबळे, तानाजी लोंढे, ज्योतिबा कांबळे, परसू वाघमारे, अमर लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सिद्धू ढोबळे, संतोष पारखे, अभिमान वाघमारे, विठ्ठल कांबळे, स्वामी शितोळे, गोविंद शितोळे, ज्ञानेश्वर हटकर, अभंग थोरात, आकाश हातागळे, स्वामीराव खंदारे, निशिकांत कदम, मल्हारी गायकवाड, रोहित कांबळे, संजय गायकवाड, प्रशांत पारसे, रोहिदास पारधे, लक्ष्मण दूणगे, हनुमंत पात्रे, अतुल क्षीरसागर, श्रीकांत शिरसागर, बाबू शिरसागर, बाबू घंटे, सतीष क्षीरसागर, विकी गायकवाड, सागर देडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मातंग समाज सचिव ज्योतिबा पारखे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल शितोळे यांनी मानले.

Spread the love

You may have missed