Kalyan Hoarding News: कल्याणमध्ये भला मोठा होर्डिंग कोसळलं, होर्डिंग कोसळतानाचा CCTV समोर

1200-675-22113330-thumbnail-16x9-hoarding-collapsed-at-sahajanand-chowk.jpg

कल्याणमध्ये सहजानंद चौकात रस्त्यावर होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून अनेक गाड्यांचेही नुकसान झाले आहे. दुर्घटना घडली त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.


कल्याण पश्चिममधील सहजानंद हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर भले मोठे होर्डिंग कोसळले. या रस्त्याच्या बाजूलाच अनेक दुकाने तसेच एक रुग्णालयदेखील आहे. होर्डिंग कोसळले तेव्हा त्याखाली अनेक गाड्या आल्याने त्या वाहनांचेदेखील नुकसान झाले. तसेच या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Spread the love