पुणे शहर:  येरवड्यामध्ये आणखी एक अपघात; भरधाव ट्रक दुभाजकावर धडकला, पहा व्हिडिओ

IMG_20240703_102907.jpg

पुणे: येरवड्यामध्ये पुन्हा एकदा एक अपघात घडला आहे. येरवड्यामधील ‘बिझनेस बे’ या ठिकाणावरून भरधाव जात असलेला अवजड ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आला. हा अपघात बुधवारी पहाटे घडला.सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा ट्रक त्याच ठिकाणी उभा होता.

या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु, हा अपघात एवढा गंभीर होता की दुभाजकाला धडकल्यानंतर या ट्रकची समोरील बाजूची काच तुटून चालक त्यावर आढळला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेन बोलवून हा ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

Link source: civic mirror

सकाळची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ होती. वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक पोलिसांकडून काळजी घेतली जात होती.

लूप रस्त्यावरील डॉन बॉक्सो स्कूल समोर पहाचे चार वाजता रस्त्यावरील गतीरोधक न दिसल्यामुळे हा अपघात घडला. मंगळवारी सकाळी त्यामुळे गोल्फ क्लब व शास्रीनगर चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

Spread the love

You may have missed