चाकणमध्ये अवैध धंद्यांचे उघड उघड साम्राज्य;
प्रशासन, राजकारणी आणि गुन्हेगारी यांची ‘मिलीभगत’ की दुर्लक्ष?

0
pudhari_import_wp-content_uploads_2023_01_Mhalunge.jpg

चाकण : ‘उद्योगांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक परिसरात सध्या अवैध धंद्यांचे जाळे उघडपणे पसरले असल्याचे चित्र आहे. वेश्या व्यवसाय, बेकायदा लॉजिंग, मटका-जुगार, अवैध गॅस रिफिलिंग तसेच बेकायदेशीर दारू विक्री हे धंदे बिनधास्तपणे सुरू असून, यामागे स्थानिक प्रशासन आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.

विशेषतः महाळुंगे इंगळे (ता. खेड) परिसरात मटका-जुगाराचे अड्डे निवडणुकांनंतर अधिक जोमात सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक तरुण, कामगार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असतानाही संबंधित यंत्रणा कारवाई का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली तसेच महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रकरणात लक्ष घालणार का, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

चाकणसारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरात अवैध धंद्यांचे वाढते साम्राज्य हे गंभीर असून, यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अन्यथा नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed