पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना : 12 जून रोजी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद

0
IMG_20250610_110513.jpg

पुणे : पुणे शहरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, कारण गुरुवारी, 12 जून रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही महत्त्वाची माहिती जाहीर केली असून, 13 जून रोजी (शुक्रवार) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

पाणी बंद ठेवण्यामागची कारणे :
कोथरुड, बाणेर, बालेवाडी, वारजे, विमाननगर, पाषाण आणि इतर भागांत नवीन जलवाहिन्या जोडण्याचे तसेच भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांमुळे संबंधित भागांतील पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

बंद राहणाऱ्या भागांची यादी :
वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत बालेवाडी जकात नाका टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण, बाणेर-पाषाण लिंक रोड, पॅनकार्ड क्लब रोडसह अनेक भागांतील पाणी बंद राहणार आहे.

भामा-आसखेड प्रकल्पामुळे प्रभावित होणारे भाग :
धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क आणि लोहगाव येथेही पाणीपुरवठा बंद राहील.

अधिक प्रभावित परिसर :
बावधन, गुरूगणेश नगर, सुरजनगर, भारतीनगर, शांतीबन सोसायटी, पूजा पार्क, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, परमहंस नगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, म्हाणतांडा, बाणेर गावठाण, पॅनकार्ड रोड, पल्लोड फार्म, मेडीपॉईंट रोड, विजयनगर आणि इतर भागांचा समावेश आहे.

नागरिकांना महापालिकेचे आवाहन :
पुणे महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे व आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. नवीन कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. दरम्यान, पाण्याचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाण्याची नियोजनबद्धता हीच खबरदारी! 12-13 जूनसाठी पाण्याचे योग्य नियोजन करा आणि गैरसोयी टाळा.

Spread the love

Leave a Reply

You may have missed