पुण्यात अवैध जुगार अड्ड्यावर छापा, सात जणांवर गुन्हा दाखल

IMG_20241110_132132.jpg

पुणे: शहरातील अवैध धंद्यांवर पूर्णपणे बंदी आणण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश असतानाही हडपसर येथील मांजरी परिसरात राजरोसपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी सात जणांवर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विजय कामठे, गुंडेराव शिंदे, महेश यादव, मुन्ना पठाण, गणेश चांदणे, महेश भोसले आणि वामन जाधव यांचा समावेश आहे.

दिव्य मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहिती अनुसार, हडपसर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रीन पार्कच्या पाठीमागे नाल्याच्या कडेला झाडा-झुडपांच्या आड असलेल्या मोकळ्या जागेत हे जुगार खेळले जात असल्याचे उघड झाले. यावेळी पोलिसांनी कारवाई करत सर्व सात आरोपींना ताब्यात घेतले.

शहरात अजूनही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने असे अवैध धंदे सुरू असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या आदेशाकडे काहींचे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाला आहे.

Spread the love

You may have missed