पुण्यातही पावसाचा जोर; हवामान विभागाचा अलर्ट; पहा व्हिडिओ

पुणे: पुणे जिल्ह्यातील काही भागांत पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. बारामतीत तब्बल १३० मिमी. पाऊस पडला असून, नीरा डावा कालवा फुटल्याने काही भागांत पाणी घरात शिरले आहे. या घटनेची पाहणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पहा व्हिडिओ
मुंबईतल्या कुलाबा वेधशाळेत ८.३० वाजेपर्यंत १३५ मिमी. पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यात सर्वाधिक २९५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. यामुळे १९१८ मधील २७९.४ मिमी पावसाचा विक्रम मोडला आहे. सांताक्रूझ येथेही या महिन्यात आतापर्यंत १९७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.