आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

mahesh-gaikwad-1_V_jpg-1280x720-4g.webp

सोलापूर : महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यभरातील तब्बल अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच नोव्हेंबर अखेरीस महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान महिलांना दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ज्याचा मोठा फायदा निवडणुकीत झाला. ही योजना आता आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर २१ एप्रिलपासून प्रभावी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारने प्रचारात महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र, महायुती सरकारने १ जुलैपासून महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याची अंमलबजावणी केली. या पार्श्वभूमीवर महिलांनी महायुती सरकारवर विश्वास दाखवत निवडणुकीत साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

राज्यातील २८८ आमदारांपैकी १८७ आमदारांना तब्बल एक लाखांहून अधिक मते मिळाल्याने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावाचा प्रत्यय आला आहे.

आता दरमहा १,५०० की २,१०० रुपये?
विधानसभा निवडणुकीनंतर योजनेच्या रक्कमेवर निर्णय होईल. लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याचे सरकारने वचन दिले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

Spread the love

You may have missed