मनसेला सत्ता द्या, रस्त्यावरची नमाज बंद करू’ राज ठाकरे यांची घाटकोपरच्या सभेतून गर्जना, पहा व्हिडिओ
पहा व्हिडिओ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली, तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी वक्तव्य केले, असा प्रश्न नितेश राणे यांना विचरण्यात आला. यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर सर्व बेकायदेशीर आहेत, ते उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करतात. राज ठाकरे जे बोलत आहेत, तिच भावना सर्व हिंदू कार्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्रात सर्व धर्म समान असेल, सर्व धर्मांना एकच कायदा लागू होईल, तर जो कायदा हिंदुना लागू आहे तोच कायदा इतरांनाही लागू झाला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, हिंदूंचे नवरात्री सण असो, श्री गणेशाची आरती रात्री १० नंतर वाजवायला परवागनी देत नाहीत. तर दुसरीकडे हे लोक पाच-पाच वेळा भोंगे लावतात, हा काय त्यांचा बापाचा पाकिस्तान नाहीये, जे इकडे येवून वाजवत बसायला. राज ठाकरे जे काही बोलत आहेत, तेच आमचेही बोलणे आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पाळली गेली पाहिजे. ‘जो कायदा हिंदूंना लागू होतो तोच कायदा मुस्लिम समाजालाही लागू झाला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनासह राज ठाकरे यांनी देखील अनेकवेळा भोंग्यांविरोधात वक्तव्य केले आहे. अमरावतीचे मनसेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (६ नोव्हेंबर) राज ठाकरेंनी मशिदींच्या भोंग्यावर भाष्य केले होते. सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली, तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही.