पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

IMG-20260130-WA0010.jpg

पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे कर्करोगाच्या आजाराने आज पहाटे निधन झाले. रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते.
शांतीलाल सुरतवाला यांनी सन १९९२-९३ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. शहराच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
राजकीय क्षेत्राबरोबरच ते पुण्यातील तंबाखू व्यवसायातील एक प्रसिद्ध व प्रतिष्ठित व्यापारी म्हणूनही परिचित होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक, व्यापारी आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावली.
त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक व व्यापारी क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट तसेच मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. अंत्यसंस्काराची वेळ व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed