पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; दोन ढोल-ताशा सदस्यांवर गुन्हा

0
216a3c3d-f2f0-453a-9512-b17e520a1977_1757248573058.webp

पुणे : तब्बल ३३ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तिरसात रंगलेल्या वातावरणात एक धक्कादायक घटना घडली. दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात वार्तांकनासाठी गेलेल्या २० वर्षीय महिला पत्रकाराचा ढोल-ताशा पथकातील सदस्यांकडून विनयभंग झाल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिताल ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी पत्रकाराच्या मार्गात अडथळा निर्माण केला. याचवेळी पथकातील एका सदस्याने ट्रॉलीचे चाक महिला पत्रकाराच्या पायावर फिरवले. याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्या सदस्याने पत्रकाराला नकोसा स्पर्श करत ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सहकाऱ्याने स्पष्टीकरण विचारल्यावर त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकारानंतर महिला पत्रकाराने थेट पोलिसांकडे धाव घेतली. फरासखाना पोलीस ठाण्यात दोन ढोल-ताशा सदस्यांविरोधात विनयभंग, शिवीगाळ आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त करत महिला पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.

छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की
याच मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यावर वार्तांकनासाठी गेलेल्या छायाचित्रकारांना देखील ढोल-ताशा पथकातील सदस्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. फोटो काढण्यास मनाई करून त्यांना रस्त्यावरून बाजूला होण्यास भाग पाडण्यात आले.

ढोल-ताशा पथकांमध्ये हाणामारी
दरम्यान, बेलबाग चौकाजवळ जिलब्या मारुती मंडळ आणि मुठेश्वर मंडळाच्या ढोल-ताशा पथकांत मिरवणुकीत पुढे जाण्यावरून हाणामारी झाली. मात्र, मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा वाद टळला.


Spread the love

Leave a Reply

You may have missed