पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अधिष्ठाता पदी डॉ. रेखा अर्कोट यांची नियुक्ती
पुणे : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अधिष्ठाता पदी वैद्यकीय तज्ञ डॉ. रेखा अर्कोट यांची नियुक्ती. नुकतीच त्यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला.
वैद्यकीय शिक्षण, चिकित्सेविषयक संशोधन आणि आरोग्य व्यवस्थापनात तीन दशकांहून अधिकचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. अर्कोट यांच्या नेतृत्वामुळे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवेत महाविद्यालयाची उंची वाढेल.
डॉ. अर्कोट या तामिळनाडूतील मेलमारुवाथुर अधिपराशक्ति चिकित्सा विज्ञान आणि संशोधन संस्था (MAPIMS) येथे शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सवेथा मेडिकल कॉलेज आणि श्री रामचंद्र मेडिकल कॉलेजसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये सेवा दिली आहे. जनरल, लॅप्रोस्कोपिक, स्तन आणि अंत:स्रावी शस्त्रक्रियेत विशेष तज्ञ असलेल्या डॉ. अर्कोट यांनी या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
स्वत:च्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना, डॉ. अर्कोट म्हणाल्या, “या प्रतिष्ठित संस्थेमध्ये सामील होताना मला अभिमान वाटतो. मी या संस्थेतील अनुभवी प्राध्यापक व विद्यार्थ्यांबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात नावीन्य आणि उत्कृष्टता या मूल्यांचा आग्रह धरून आम्ही पुढे जाऊ.”
आदरणीय डॉ. पी. डी. पाटील -कुलपती डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “आम्ही डॉ. रेखा अर्कोट यांचे अधिष्ठाता म्हणून स्वागत करत आहोत. त्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील आणि नेतृत्वातील अनुभवामुळे संस्थेच्या प्रगतीला चालना मिळेल. मला खात्री आहे की त्यांचे ज्ञान आमचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल.”
आदरणीय डॉ. भाग्यश्री पाटील प्र-कुलपती – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाल्या, “डॉ. रेखा अर्कोट यांची नियुक्तीमुळे संस्थेच्या दूरदृष्टीने भविष्यकालीनहित साद्य करण्यास सक्षमतेचे नेतृत्व करतील. त्यांचे चिकित्साविषयक ज्ञान आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे समन्वय संस्थेच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शैक्षणिक आणि रुग्णसेवेत मोठे यश मिळवू अशी आम्हाला खात्री आहे.”
तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे येथील विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. यशराज पाटील म्हणाले, “डॉ. रेखा अर्कोट यांची अधिष्ठाता पदी नेमुणूक झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचा वैद्यकीय शिक्षणातील अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूल्यमापनात नवा विक्रम घडवेल त्यांच्या नेतृत्वामुळे आमच्या संस्थेची उंची अधिक वाढेल.”
डॉ. अर्कोट यांच्या नियुक्तीमुळे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय नवीन उंचीवर पोहचेल. रॉयल कॉलेज ऑफ ग्लासगोची फेलो असलेल्या आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) कडून हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये प्रमाणित असलेल्या डॉ. अर्कोट यांच्या नेतृत्वामुळे संस्थेचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनातील दर्जा उंचावेल.