येरवडा येथील उर्दू शाळांना २० लाखांचा विकासनिधी; पूजा व कुराण पठणानंतर कामाला सुरुवात

0
IMG-20250823-WA0006.jpg

पुणे : येरवडा येथील शहिद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा आणि स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना मिळालेल्या २० लाख रुपयांच्या विकास निधीचे काम शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट २०२५) सुरू झाले.

कामाच्या प्रारंभी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अशोक भवारी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने कुराण पठण करण्यात आले.

या प्रसंगी शहिद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळेचे चारही मुख्याध्यापक – जमाल शेख, जावेद शेख, वहिदा शेख आणि कौसर सय्यद तसेच स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सफिया शाहिद शेख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते एजाज रहमान खान, गणेश ढोकळे, बाबु चौधरी, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“सदर विकासकाम लवकर पूर्ण होऊन शाळांना उत्कृष्ट दर्जाची सुविधा मिळो,” अशी प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply