योजनांचा लाभ घ्यायला नागरिकांची गर्दी, पण प्रशासनाचा गोंधळ; येरवड्यातील शिबिरात नागरिक हैराण – व्हिडिओ

0
IMG_20250424_133550.jpg

पुणे, २४ एप्रिल: संजय गांधी निराधार योजना तसेच इतर योजनांच्या प्रलंबित लाभार्थ्यांची माहिती डीबीटी (DBT) पोर्टलवर आधार प्रमाणे अद्ययावत करण्यासाठी येरवड्यातील क्षेत्रीय कार्यालयात गुरुवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिरात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला.

शिबिरात आधार कार्ड आणि बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया करण्यात येणार होती. हे काम पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना योजना अंतर्गत पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला आणि अपंग नागरिक यांची संख्याही लक्षणीय होती. मात्र, शिबिरासाठी आवश्यक ती कर्मचारी संख्या नसल्याने एकच गोंधळ उडाला.

पहा व्हिडिओ

शिबिरस्थळी बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. उन्हाळ्याच्या कडक तापमानात नागरिकांना तासन्‌तास उभं राहावं लागलं. पंख्यांचीही कोणतीही व्यवस्था नव्हती, त्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले होते. या गैरसोयींमुळे नागरिकांत संतापाचा सूर उमटला होता. काही ठिकाणी हमरीतुमरीची परिस्थिती निर्माण झाली.

या शिबिरातील अकार्यक्षमतेला तलाठी कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आलेल्या गरजू नागरिकांची झालेली हेळसांड प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे फलित असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे

Spread the love

Leave a Reply