हवेली २० चे सह-दुय्यम निबंधक पोपटराव भोई यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी; निलंबनाची जोरदार मागणी – व्हिडिओ

0
IMG_20250618_175520.jpg

पुणे – हवेली क्र. २० नोंदणी कार्यालयातील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने सह-दुय्यम निबंधक पोपटराव भोई यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करत निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सातत्याने तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

लोक जनशक्ती पार्टीने केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, भोई यांच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर दस्त नोंदणीसंदर्भात तक्रारी होऊन त्यांचे निलंबन झाले होते. मात्र, तरीही त्यांची पुन्हा त्या पदावर नेमणूक का करण्यात आली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप असून, दस्त नोंदणी तपासणी पथकाच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

पक्षाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

1. १५ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या करारनाम्यांची चौकशी:
हवेली २० नोंदणी कार्यालयामार्फत ग्रामपंचायत परवानगी असलेल्या इमारतींमध्ये बिल्डरकडून नोंदवण्यात आलेल्या करारनाम्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून सखोल तपास करण्यात यावा.


2. तपासणी पथकाची खातेनिहाय चौकशी:
दस्त नोंदणी तपासणी पथकातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी.


3. फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल:
भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९८ व १९९ नुसार दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करण्यात यावेत.


4. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत मालमत्ता चौकशी:
आरोपांनुसार संबंधित अधिकाऱ्यांची संपत्ती व त्यामधील वाढ लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून उघड करण्यात यावी.


लोक जनशक्ती पार्टीनचें  पुणे जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करत स्पष्ट इशारा दिला आहे की, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलण्यात येतील. आता प्रशासन या गंभीर तक्रारीकडे कोणती भूमिका घेतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed