वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा; व्हिडिओ वायरल

वटपौर्णिमेला हिंदू महिला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. पण सध्या वास्तवात अनेक पुरूष पत्नी पीडीत आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.
पिंपळाच्या झाडाला काही पुरूषांनी उलट्या दिशेने फिरून प्रदक्षिणा मारल्याचं बघायला मिळालं आहे. सध्या या ‘पिंपळपौर्णिमे’चा व्हिडिओ वायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्येपत्नीपीडितसंघटनाआहे. या पत्नीपीडित संघटना दरवर्षी वटपौर्णिमा च्या आधी पिंपळपौर्णिमा साजरी करतात.
पिंपळपौर्णिमा चा व्हिडीओ वायरल