लाच घेताना रंगेहात पकडले : शिरूर उपविभागीय कार्यालयात धाड; लाच मागितल्याप्रकरणी अव्वल कारकून व साथीदाराला अटक

लाच-घेताना-1140x570.jpg

पुणे : टेमघर धरणासाठी संपादित जमिनीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरूर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून सुजाता मनोहर बडदे व तिचा खासगी साथीदार तानाजी श्रीपती मारणे (वय ४६, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली.

तक्रारदाराने महाराष्ट्र सरकारकडून शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे दोन गुट्ट्यांच्या भूखंडासाठी प्रस्ताव दिले होते. या आठ प्रस्तावांचे मंजुरीसाठी बडदे हिने प्रत्येकी ५० हजार असे एकूण चार लाख रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने ४ फेब्रुवारी रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली होती. पडताळणीत बडदे हिने तडजोडीअंती ४० हजार रुपयांप्रमाणे एकूण ३ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम तानाजी मारणे याला देण्याचे निर्देश दिले होते.

१० फेब्रुवारी रोजी सापळा रचून पहिल्या हप्त्याचे १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना मारणे याला रंगेहात पकडण्यात आले. बडदे हिलाही अटक करण्यात आली असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे शासकीय कामकाजातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

Spread the love

You may have missed