पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल; गणेशोत्सवानिमित्त ‘हे’ रस्ते बंद

0
IMG_20250826_145051.jpg

पुणे: उद्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून बाजारपेठा चांगल्याच फुलल्या आहेत. गणपती बाप्पासाठी सजावट, आरास, हार, नवनवीन डेकोरेशन साहित्य, मकर घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरु आहे.

खास करून मुंबई- पुणेसारख्या शहरात तर गणेशोत्सवाच्या काळात मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी बघायला मिळते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा उदभवतो. यावर उपाय म्हणून पुणे प्रशासनाने काही प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी बंदी घातली आहे. सदर रस्त्यांवरून प्रवास करताना अवजड वाहने चालवता येणार नाहीत. 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत हि बंदी असेल.

कोणकोणत्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी?

शास्त्री रोड (सेनादत्त चौक ते अलका चौक)
टिळक रोड (जेधे चौक ते अलका चौक)
कुमठेकर रोड (शनिपार ते अलकाचौक)
लक्ष्मी रोड (संत कबीर चौक ते अलका चौक)
केळकर रोड (फुटका बुरुज ते अलका चौक)
बाजीराव रोड (पुरम चौक ते गाडगीळ पुतळा)
शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
कर्वे रोड (नल स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक)
FC रोड – खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक
जंगली महाराज रोड- स.गो. बर्वे चौक चे खंडोजीबाबा चौक सिंहगड रोड- राजाराम ब्रिज ते सावरकर चौक गणेश रोड / मुदलियार रोड- पॉवरहाऊस – दारुवाला- जिजामाता चौक- फुटका बुरूज

दरम्यान, शहरातील मध्यवर्ती भागात गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान शिवाजी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दरवर्षी श्रमिक भवन, कसबा पेठ पोलिस चौकी आणि मंडईपर्यंतच्या परिसरात गणेशमूर्ती विक्रीसाठी अनेक स्टॉल लावले जातात, त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील गगडिल पुतळा ते गोटीराम भैया चौक दरम्यानचा भाग वाहतुकीसाठी बंद राहील. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंहगड रोडवरील सावरकर पुतळा ते समाधान भेळ दरम्यानच्या रस्त्यावर आणि मुंढवा येथील केशवनगर येथील कुंभारवाडा येथे गणेशमूर्तींची विक्री केली जात असल्याने गर्दी टाळण्यासाठी या भागातून वाहने पर्यायी मार्गांनी वळवण्यात येतील.

Spread the love

Leave a Reply