विश्रांतवाडी भीमनगरमध्ये आझाद फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन विशेष कार्यक्रम

पुणे – ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आझाद फाउंडेशनच्या वतीने विश्रांतवाडी भीमनगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात मुलांनी देशभक्तीपर गीत आणि सांस्कृतिक भाषणे सादर करून देशप्रेमाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, कार्याध्यक्ष अनिल पटेकर तसेच कार्यकर्ते संतोष पवार, चेतन धोत्रे, करण वाघमारे, चेतन कराळेकर, झहीर शेख, नौशाद सय्यद, वसीम अक्रम सय्यद, शाहरुख सय्यद, रोहित देडे व रवि राठोड यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सतीश मस्के, आदम सय्यद, समीर शेख, जितेंद्र कराळेकर, विशाल भोसले, अल्लाउद्दीन सय्यद, नागेश देडे, शुभम वाघमारे, विकास पारडे, अंबादास दहिरे, छायाताई सोनवणे, आशा पारडे व नानाभाऊ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदात पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक व पदाधिकाऱ्यांचे फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.