अक्कलकोट : अज्ञात इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू

अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनमध्ये मयत क्र. 22/2025 प्रमाणे एक मयत दाखल करण्यात आला आहे. सदर मयत अनोळखी पुरुष जातीचा असून, अंदाजे वय 30 ते 35 वर्षे आहे. प्रथमिक माहितीनुसार सदर इसमाचा मृत्यू अज्ञात रेल्वेच्या धडकेत झाला आहे.
सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे जर कोणाला या व्यक्तीबाबत काही माहिती असेल किंवा तो कोणाच्या ओळखीचा असेल, तर त्यांनी तात्काळ अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
सपोनि साईनाथ सुरवसे – 9766105366
पोलीस नाईक HC/1455 पाटील – 8378828803