देहूरोड येथे भरधाव डंपरची कारला धडक; चालक जखमी

0
accident-1-1_V_jpg-1280x720-4g.webp

पिंपरी : भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने कारला धडक दिल्याने कारचालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर देहूरोड येथील सहायक पोलिस आयुक्त कार्यालयासमोर घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी ज्ञानेश्वर अशोकराव राऊत (वय २९, रा. ईट, धाराशिव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डंपर चालक बबलू कुमार कमल सिंग (वय ३४, रा. चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डंपर भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. या धडकेत कारचालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed