Weather Update Today: पुण्यात आजपासून 22 जून पर्यंत पाऊसाची शक्यता तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस येल्लो अलर्ट!

n61842734017187761756755f1643ad229ef49a9b5f6accd30a8812c084ab2d0cc91e21a20beae2ea345a21.jpg

Weather Update Today: नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा स्थिर असून कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार रायगड व रत्नागिरीमध्ये पुढील पाच दिवस तर सिंधुदुर्गमध्ये उद्यापासून पुढील चार दिवस तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात पुणे व सातारा मध्ये 19 जून ते 22 जूनच्या काळात व कोल्हापूरला 22 जूनला घाट भागात तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेडमध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह तसेच वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, विदर्भात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस येलो अलर्ट दिला आहे. पुणे व परिसरात आज पासून पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाच्या एक किंवा दोन सरी पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed