फेसबुकवरील मैत्री ठरली महाग; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची ९२ हजारांची फसवणूक

0
803374-89bef9f3-d403-425f-bbdc-24e0a367ef56.jpg

पुणे : फेसबुकवर ओळख वाढवत प्रेमसंबंध निर्माण करून एका तरुणीची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. बहिणीच्या लग्नाचे कारण सांगत एका तरुणाने तरुणीकडून सुमारे ९२ हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२५ रोजी आंबेठाण येथील दवणे वस्ती परिसरात घडली.

या प्रकरणी रेन संजय कुशवाह (वय २५, रा. पवार बिल्डिंग, आंबेठाण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बबलू रवींद्र कुशवाह (रा. रामबाग, कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. पुढे प्रेमाचे नाते निर्माण करत बहिणीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून त्याने फिर्यादीकडून ९२ हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम तसेच मोबाईल घेतले. मात्र, या वस्तू परत न करता आरोपीने तरुणीचा विश्वासघात करून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed