पुणे: विमाननगरात ट्रॅफिकचा खेळखंडोबा; ‘वाहतूक पोलीस सुट्टीवर, नागरिक ड्युटीवर’ अशी अवस्था – व्हिडिओ

0
IMG_20251217_195327.jpg

पुणे: विमाननगर परिसरात चौका-चौकात ट्रॅफिक जामने नागरिकांची अक्षरशः कोंडी झाली आहे. साकोरेनगरकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे ठप्प झाला असून वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पसरल्या. विशेष म्हणजे या साऱ्या गोंधळात वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

पहा व्हिडिओ

जिथे सिग्नल असायला हवेत, तिथे गोंधळ; जिथे वाहतूक कर्मचारी असायला हवेत, तिथे मात्र अनुपस्थिती—अशी ‘नियोजनशून्य’ परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी, ट्रॅफिक सुरळीत करण्याची जबाबदारी चक्क नागरिकांवरच येऊन पडली. काही ठिकाणी हातवारे करत, तर काही ठिकाणी शिट्या वाजवत नागरिकच वाहतूक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले.

“वाहतूक विभाग नेमका काय करतो?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रोजचा हा जाम, अपुरा कर्मचारीवर्ग, आणि तुटपुंजे नियोजन—यामुळे विमाननगर परिसरात वाहनचालकांचा संयम सुटत चालला आहे. ऑफिस वेळेत तर परिस्थिती आणखी बिकट होते; रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि सार्वजनिक बसही या जाममध्ये अडकून पडतात.

वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर टीका करताना नागरिक म्हणतात, “पगार वाहतूक कर्मचाऱ्यांचा, काम मात्र नागरिकांचे!” प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हा ‘ट्रॅफिक तमाशा’ असाच सुरू राहणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed