येरवडा फुलेनगर व प्रभाग १३ मध्ये उत्साहाचे वातावरण; इमामभाऊ शेख यांनी भाजप उमेदवारीसाठी अर्ज दाखल
पुणे | येरवडा परिसरातील राजकीय वातावरणाला नवसंजीवनी देणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. अल्पसंख्याक येरवडा फुलेनगर मंडळाचे अध्यक्ष व समाजातील लोकप्रिय कार्यकर्ते मा. इमामभाऊ शेख यांनी प्रभाग क्रमांक १३ या ठिकाणांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.
इमामभाऊ शेख यांनी भाजपचे शहराध्यक्ष मा. धीरज घाटे यांच्याकडे अधिकृतरीत्या इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण येरवडा भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा माहोल पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिक व समर्थकांनी शेख यांचे हार्दिक अभिनंदन करत आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
समर्थकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला—
“जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी!”
या उमेदवारी अर्जामुळे येरवड्यातील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.