पुणे: दिघीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दहा जणांना अटक
पुणे, दि. ३० ऑक्टोबर : दिघी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी (दि. २५) सायंकाळी डुडुळगाव येथे एस.पी. कॉलेजच्या मागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्तीच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत दहा जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपसात संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांचा (तीन पत्ती) जुगार खेळत असताना पोलीस अंमलदार उमेश दिलीप कसबे (वय २७) यांनी छापा टाकून सर्वांना पकडले. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
गोविंद बाबुराव धायगुडे (४३), राहुल मुंजाजी चिलगर (२८), गणेश रामभाऊ पांचाळ (३४), वाल्कीक वसंतराव कदम (३०), सुभाष हरीश्चंद्र शिंदे (३५), सचिन दगडू गायकवाड (३५), विनोद काळुराम पगडे (४०), सुनील महादेव शिंदे (३८), विठ्ठल तुकाराम सलगर (२६) आणि चंद्रकांत हरीभाऊ तळेकर (६६).
पोलिसांनी आरोपींकडून पत्त्यांचा संच आणि जुगारात वापरलेली रोकड जप्त केली असून दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.